Homeताज्या बातम्यामनोरंजन

सनी देओलचा ‘गदर 2’ च्या प्रमोशनला सुरुवात

बॉलीवूडचा लाडका आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ज्या अभिनेत्याने आपली ओळख निर्माण केली तो अभिनेता म्हणजे सनी देओल आहे. आता सनी देओलचा आगामी चित्रपटाम

सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा
सनी देओलने केले ‘ऍनिमल’मधील बॉबी देओलच्या अभिनयाचे कौतुक
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सनी देओलने तोडले मौन

बॉलीवूडचा लाडका आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ज्या अभिनेत्याने आपली ओळख निर्माण केली तो अभिनेता म्हणजे सनी देओल आहे. आता सनी देओलचा आगामी चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सनी देओलचा चित्रपट लवकरच म्हणजे 11ऑगस्टला हा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे आता सनी देओलने चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. हे प्रमोशनदेखील हटके पद्धतीने सुरु असल्याचे देखील दिसून येत आहे. सनी देओलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर ही प्रमोशनला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तो म्हणताना दिसत आहे की, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांबरोबर गदर 2च्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. पुढे त्याने म्हटले आहे की, लोंगवालाच्या लढाईत ज्यांनी आपला प्राण गमावून इतिहास लिहिला अशा कुलदीप सिंग चांदपुरी आणि वीर जवानांना आठवत त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. अशा धाडसी लोकांना भेटून आणि ऐतिहासिक ठिकाणी येऊन नेहमीच हृदय भरुन येते असे म्हणत सनी देओलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अमिषा पटेल आणि बॉबी देओल यांनी कंमेट केली आहे.

COMMENTS