Homeताज्या बातम्यामनोरंजन

सनी देओलने केले ‘ऍनिमल’मधील बॉबी देओलच्या अभिनयाचे कौतुक

मुंबई प्रतिनिधी - संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित

सनी देओलचा ‘गदर 2’ च्या प्रमोशनला सुरुवात
सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सनी देओलने तोडले मौन

मुंबई प्रतिनिधी – संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 750 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. या चित्रपटावर सर्वसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉबी देओलचा भाऊ सनी देओलने ‘ॲनिमल’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातील काही सीन्स आवडलं नसल्याचं सनीने स्पष्ट म्हटलंय. सनी म्हणाला, “मी खरंच बॉबीसाठी खूप खुश आहे. मी त्याचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला आणि तो मला आवडला. हा एक चांगला चित्रपट आहे. पण त्यातील काही गोष्टी मला आवडल्या नाहीत, ज्या मला माझ्या चित्रपटांसहित इतरही अनेक चित्रपटांमध्ये आवडल्या नाहीत. एक व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून मला त्या गोष्टी आवडण्याचा किंवा न आवडण्याचा अधिकार आहे. पण एकंदर पाहता ‘ॲनिमल’ हा चांगला चित्रपट आहे. त्यातील संगीत खूप चांगलं आहे आणि सीनसोबत ते उत्तमरित्या जमलंय. बॉबी तर नेहमीपासून बॉबी राहिला आहे, पण आता या चित्रपटानंतर तो लॉर्ड बॉबी ठरला आहे.”

COMMENTS