Homeताज्या बातम्यादेश

सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास सुरू

फ्लोरिडा : तब्बल 9 महिने आणि 13 दिवस अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्य

तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद
आता पाण्यावर धावणार मेट्रो
ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

फ्लोरिडा : तब्बल 9 महिने आणि 13 दिवस अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांच्यासोबत, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उपस्थित असलेले क्रू-10 चे आणखी दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांनी मंगळवारी अंतराळ स्थानक सोडले. चारही अंतराळवीर ड्रॅगन अंतराळयानात चढल्यानंतर, मंगळवारी सकाळी 08:35 वाजता अंतराळयानाचा हॅच बंद करण्यात आला आणि सकाळी 10:35 वाजता अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले. ते बुधवारी रोजी पहाटे 3:27 वाजता फ्लोरिडाच्या किनार्‍यावर उतरेल.

COMMENTS