Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

माजी मंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

मुंबई ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना राजकीय वारे कुठे वाहत आहे, याचा अंदाज आता राजकीय नेत्यांना येऊ लागल्याने अनेकांना आता प

मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज भाविकांना दर्शनास खुले
जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या | LokNews24
लहान मुलांना जिवंत जाळले, महिलांवर अत्यावर हमासच्या दहशतवाद्यांची कू्ररता

मुंबई ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना राजकीय वारे कुठे वाहत आहे, याचा अंदाज आता राजकीय नेत्यांना येऊ लागल्याने अनेकांना आता परतीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच नाशिकमध्ये खासदार शरद पवार एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते, यावेळी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी अजित पवारांवर टीका करतांना बारामती वगळता अजित पवार कुठेही महायुतीच्या प्रचाराला दिसले नाहीत, कदाचित बारामतीच्या प्रचारामुळे त्यांची तब्बेत बरी नसावी अशी खोचक टीका शरद पवारांनी केली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार, छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आता सुनील तटकरे यांनी शरद पवार थांबलेल्या हॉटेमध्ये भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया 20 मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिक मध्ये तळ ठोकून आहेत. मनमाड येथील सभा संपल्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांना नाशिक मधील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. या वेळी त्यांच्या हॉटेलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिली असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात मी स्वतः त्यांना भेटलो नसलो तरी त्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार हे प्रचारापासून लांब राहिल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला आणि रोड शोला देखील अजित पवार अनुपस्थितीत होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

छगन भुजबळ महायुतीत नाराज – अजित पवारांसोबत गेलेले मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. कारण काही दिवसांपूर्वीच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भुजबळांनी थेट उद्धव ठाकरेंची बाजू घेत ही सत्ताधार्‍यांची चूक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भुजबळ महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भुजबळ नाराज असल्याचे ऐकले मात्र माझ्याशी कोणी संपर्क केला नसल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे.दरम्यान सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही आता भाजपसोबत आहोत त्यामुळे जुनी कोणतीही सल नाही. छगन भुजबळ हे नाशिकच्या प्रचारात सक्रिय नाहीत यात काही तथ्य नाही.भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय आहे. जुनी कटुता राहण्याचे काही कारण नाही. भुजबळांची नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती त्यानंतर काही प्रश्‍न नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

तटकरेंनी भेटीचे वृत्त फेटाळले – खासदार शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीच्या दाव्यावर बोलतांना सुनील तटकरे म्हणाले की, विकृतपणा थांबवा, वॉशरुमसाठी गेलो होतो.  माझी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट होण्याचे काही कारण असू शकत नाही. रस्त्यावरचा प्रवास करत असताना मी फार लांबून नाशिकमध्ये पोहोचलो होतो. माझी पुढची मीटिंग तेथे होती. कार्यकर्ता गाडीमध्ये होता, त्याला विचारलं इथं वॉशरुमची सोय आहे का? तिथे मी गेलो. 3-4 मिनीटे थांबलो. असे तटकरे म्हणाले आहेत.

COMMENTS