Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची रविवारी नियुक्ती करण्यात आली. या पदावर विराजमान होणार्‍या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार | LokNews24
पाच गावठी कट्ट्यासह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशात उष्णतेची लाट

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची रविवारी नियुक्ती करण्यात आली. या पदावर विराजमान होणार्‍या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.  सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.  नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS