Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

बीड जवळील तिप्पटवाडी शिवारात केले विष प्राशन

वडवणी प्रतिनिधी - वडवणी तालुक्यातील साळींबा शिवारात शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी कृष्णा बालाजी सत्वधर (वय 27 वर्ष) यांनी सततच्या शेतीच्या नाप

केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वडवणी प्रतिनिधी – वडवणी तालुक्यातील साळींबा शिवारात शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी कृष्णा बालाजी सत्वधर (वय 27 वर्ष) यांनी सततच्या शेतीच्या नापिकीला कंटाळून व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा तणाव असल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि.30 एप्रिल रोजी बीड जवळील तिप्पटवाडी शिवारात घडली आहे. दरम्यान या आत्महत्येमुळे वडवणी तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांची समस्या अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने सत्वधर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
वडवणी तालुक्यातील साळींबा शिवारात कृष्णा बालाजी सत्वधर (वय 27 वर्ष) यांच्या नावची केवळ सव्वा एकर शेती असून याच अल्पशा शेतीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असायचा. पूर्वी छोट्या कुटुंबामध्ये शेती व मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागून जायचा. मात्र या शेतकर्‍याचा विवाह व त्यानंतर झालेली मुलं यामुळे आता आपले कुटुंब जगवायचे कसे? तसेच इंडिया बँकेचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न कृष्णा सत्वधर यांना वारंवार सतावत असे. केवळ शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्याने ते बीड येथे एका खाजगी दुकानात मजुर म्हणून कामाला जात होते. दिनांक 29 एप्रिल 2023 शनिवार रोजी सकाळी जेवणाचा डबा घेवून ते नेहमीप्रमाणे बीड या ठिकाणी कामाला गेले होते. मात्र त्यादिवशी रात्री ते वापस घरी वडवणी या ठिकाणी आलेच नाहीत. दुसर्‍या दिवशी रविवार रोजी सकाळीही ते वापस न आल्याने घरचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. त्यांनी याबाबत चौकशी केली असता, ते दुकानावर आलेच नसल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीयांनी दुसर्‍या दिवशी वडवणी पोलीस ठाण्याला हरवले बाबत तक्रार दिली व शोध कार्य सुरु केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाला त्यांचे मोबाईल लोकेशन हे बीड जवळील तिप्पटवाडी शिवारामध्ये असल्याचे आढळून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या ठिकाणी जावून शोध घेतला असता त्या ठिकाणी एका निर्जन स्थळी लिंबाच्या झाडाखाली बेशुध्द अवस्थेत ते पडल्याचे दिसून आले. त्यांनी विषारी औषध प्राशन केलेले होते. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी येवून घटनास्थळाचा पंचनामा केला व बेशुध्द अवस्थेत असलेल्या त्या शेतकर्‍याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना पूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. रविवारी रात्री उशिरा वडवणी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अल्पभूधारक शेतकरी कृष्णा सत्वधर यांचे केवळ दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. आता त्यांना केवळ 10 महिने वयाच्या दोन जुळ्या मुली असून या सोबतच त्यांच्या पश्चात वृध्द आई व पत्नी असे त्यांचे एकूण कुटुंब आहे. ते एकुलते एक असल्याने व वडील नसल्याने तेच कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष होते. मात्र आता या कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात होवून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. तरी या अल्पभूधारक शेतकरी आत्महत्याच्या पश्चात शासनाने सदर कुटुंबास मदत देणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या कुटुंबातील त्यांची वृध्द आई, पत्नी व दोन चिमुकल्या जुळ्या मुली यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निश्चितपणे हातभार लागेल.

COMMENTS