Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैठण तालुक्यातील शेतकर्‍याची आत्महत्या

पैठण ः यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम धोक्यात आल्यानंतर अवकाळी पावसाने रब्बी हंगाम देखील वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाल

’तनपुरे’च्या संचालकांची चौकशीचे खंडपीठाचे आदेश
उपसभापतींच्या निर्णयाविरोधात शिंदे गट जाणार न्यायालयात
कर संकलनात वाढ, मात्र जनतेचे काय ?

पैठण ः यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम धोक्यात आल्यानंतर अवकाळी पावसाने रब्बी हंगाम देखील वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. त्यामुळे डोक्यावर असलेले पैसे कसे फेडायचे, हा शेतकर्‍यांसमोर गहन प्रश्‍न आहे. एकीकडे नापिक आणि दुसरीकडे कर्ज फेडण्यासाठी बँकेने नोटीस पाठवल्याने कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण कुतुबखेडा येथे 43 वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. नारायण भाऊसाहेब करंगळ असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. बँकेकडून घेतलेले 7 लाख रुपयांचे कर्ज भरण्यायासाठी त्यांना नोटीस आली होती. आधीच नापिकी आणि आता नोटीस आल्यामुळे कर्जाची परतफेड करायची कशी याचीच चिंता त्यांना सतावत होती. नारायण करंगळ हे शेतात गेले आणि शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी शेतातच विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. माहिती मिळताच नातेवाइकांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS