Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

संरक्षण जाळीवर पडल्याने थोडक्यात बचावला

मुंबई : मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात बांधलेल्या संरक्षण जाळीवर या तरूणाची उडी मारली आहे. पोलिसांनी आणि

काॅर्पोरेट क्षेत्र आणि पवार-बॅनर्जी भेटीचा अन्वयार्थ!
गोकुंदा स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज

मुंबई : मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात बांधलेल्या संरक्षण जाळीवर या तरूणाची उडी मारली आहे. पोलिसांनी आणि इतर कर्मचार्‍यांनी या तरुणाला सुखरुप बाहेर काढले आहे. मंत्रालयात हा प्रकार घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते.
आपल्या मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप या तरुणाचा आहे. हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. बापू नारायण मोकाशी असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारच्या दुपारच्या सुमारास त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत तो अडकला आणि जीव वाचला मंत्रालयाला लावलेल्या संरक्षण जाळ्यांमुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले असून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. रुग्णवाहिकेतून नेले जात असताना त्याला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण विचारण्यात आले असता त्याने प्रेयसीवर बलात्कार झाला असून, न्याय मिळाला नसल्याचे म्हटले. पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत.

COMMENTS