Homeताज्या बातम्यादेश

उच्च न्यायालयात न्यायमूर्तीसमोरच आत्महत्येचा प्रयत्न

स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न कर्नाटकातील घटनेने खळबळ

बंगळुरू ः कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आतमध्ये कोर्ट हॉलमध्ये मुख्य न्यायमूर्ती निलय विपिनचंद्र अंजारिया यांच्यासमोरच चाकूने आपला गळा कापून घेत आत्

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून;
ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल
राजकीय वादातून चक्क ढाबाच दिला पेटवून | LOKNews24

बंगळुरू ः कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आतमध्ये कोर्ट हॉलमध्ये मुख्य न्यायमूर्ती निलय विपिनचंद्र अंजारिया यांच्यासमोरच चाकूने आपला गळा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूर येथे राहणार्‍या श्रीनिवास यांनी कोर्ट हॉल वनच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्‍यांकडे एक फाइल सोपवली व कोणाला काही समजण्यापूर्वी त्यांनी मुख्य न्यायाधीश अंजारिया यांच्या समोरच आपला गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
न्यायालय परिसरात उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्या व्यक्तीकडे धाव घेत त्यांच्या हातातून चाकू हिसकावून घेतला व जखमी अवस्थेत त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी सांगितले की, श्रीनिवास यांनी टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समजलेली नाही. तो न्यायालयाच्या हॉल नंबर एकमध्ये पोहोचला व त्याने आपल्याजवळ असलेल्या चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. तेथे तैनात सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला पाहिले व तत्काळ त्याला रुग्णालयात हलवून त्याचा जीव वाचवला. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. मुख्य न्यायाधीश अंजारिया यांनी उच्च न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणावर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांना विचारले की, एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन न्यायालयाच्या आतमध्ये कसा काय येऊ शकतो. त्यांनी पोलिसांना आदेश दिला आहे की, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे व जबाबाच्या नोंदी ठेवाव्यात. श्रीनिवास यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांनी जी फाईल दिली होती, त्यातील कंटेंट अजून समोर आला नाही. न्यायालयाने म्हटले की, ते कागदपत्रांची चौकशी करेल कारण हे कागदपत्रे कोणत्या प्रसिद्ध वकीलाने न्यायालयात सादर केलेली नव्हती.

COMMENTS