Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 24 सैनिक ठार

इस्लामाबाद ः वायव्य पाकिस्तानमध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील  दाराबा

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
पत्रकारांनी नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे – वसंत मुंडे

इस्लामाबाद ः वायव्य पाकिस्तानमध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील  दाराबा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार आर्मी बेसच्या इमारतीला धडकवली. या हल्ल्यात कमीत कमी 24 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 34 सैनिक जखमी झाले आहेत. डेरा इस्माइल खान जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत आहे. हा जिल्हा खैबर पख्तून्ख्वां  जवळ असून हे ठिकाण तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) चा गड मानले जाते.  दहशतवाद्यांनी एक स्थानिक पोलिस ठाणे व आर्मी बेसला निशाणा बनवले आहे. या हल्ल्यात 24 सैनिक मारले गेले आहेत.

COMMENTS