Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुज्ञ जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकाने त्यांच्या काळात फक्त आश्‍वासने दिली. मात्र, आपल्या महायुतीच्या सरकारने सर्व घटकांसाठी विविध कल्या

कराड तालुक्यात साडेसत्तावीस लाखांची वीज चोरी
आ. गोरेंना तत्काळ अटक करा; अन्यथा 25 ला आंदोलन; जनता क्रांती दलाचा इशारा
इस्लामपूरात वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब हटवण्यास प्रारंभ

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकाने त्यांच्या काळात फक्त आश्‍वासने दिली. मात्र, आपल्या महायुतीच्या सरकारने सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यामुळे जनतेला हे आपलं सरकार वाटत आहे. विरोधकांनी किती ही कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ जनता विद्यमान आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील आष्टा येथे प्रचार दौर्‍यादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील काशिलिंगनगर, डांगे कॉलेज परिसर, सिध्दार्थनगर, जुगाई मंदिर परिसर, खोत मळा, संतसेना, अदिष्ठानगर आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विरोधकांनी आज आष्टा शहरात चार-चार गट केले आहेत. त्यामुळे एकमेकांचे पाय खेचण्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. येथे अडीचशे एकर जमीन क्षारपड आहे. तिथे एमआयडीसी झाली असती तर तरुणांना रोजगार मिळाला असता. लोक सक्षम बनली असती. परंतू आपले राजकारण संपुष्टात येईल, या भीतीने विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक ती काळजी घेतली. जो माणूस 35 वर्षात तुम्हाला रोजीरोटी देऊ शकत नाही. मग त्याला निवडून देऊन तुम्हाला काय मिळाले. लोक म्हणतात दादा आता बिनकामाचे पार्सल कासेगावला पाठवा. पण मी त्यांना म्हटले कासेगावची जनताही त्यांना कंटाळली आहेत. ते पण त्यांना घ्यायला तयार नाहीत. त्यांना आता सगळेच वैतागली आहेत. त्यामुळे यंदा बदल नक्की आहे.

COMMENTS