Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टायर फुटल्याने कराड शहरात ऊसाचा ट्रक पलटी

कराड / प्रतिनिधी : कराड शहरातील मुख्य चौक असलेल्या विजय दिवस चौकात आज दुपारी 2.15 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. चौकात सर्वात जास्त वाहतू

राष्ट्रवादीचा इस्लामपूर बाजार समितीवर 17-1 ने दणदणीत विजय
म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई
शेतीच्या पिकांची मशागत नव्या उमेदीने सुरू

कराड / प्रतिनिधी : कराड शहरातील मुख्य चौक असलेल्या विजय दिवस चौकात आज दुपारी 2.15 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. चौकात सर्वात जास्त वाहतूक असते. तसेच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे ट्रक पलटी होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
मायणी येथून उसाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच 04 बीजी 3740) हा कराड शहरातून उंडाळे रस्त्याला असलेल्या एका साखर कारखान्याकडे निघाला होता. कराड शहरातील विजय दिवस चौकात सिग्नलजवळ आल्यानंतर ट्रकचा पाठीमागील अ‍ॅक्सल तुटल्याने हा अपघात झाला. अ‍ॅक्सल तुटल्याने पाठीमागील दोन्ही चाके बाजूला तुटून गेली होती. अपघात मोठा झाला असला तरी यामध्ये प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजय दिवस चौकात कराड-विटा मार्गावर हा अपघात झाला. येथे विटा-पुसेसावळी, मसूर या भागात जाणारी खासगी प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. तसेच शेजारी छ. शिवाजी व विठामाता हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या चौकात पाच रस्ते येतात. त्यामुळे वाहतूकीची वर्दळ मोठी असते. तरीही अपघातात केवळ चालक जखमी झाला आहे. मात्र, ट्रक पलटी होताच या मार्गावर पाचही रस्त्यांवर ट्रफिक जाम झाले होते.

COMMENTS