साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने स्थानिक बाजारपेठेत साखर किमान दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग

15 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक जाळ्यात
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद
शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने स्थानिक बाजारपेठेत साखर किमान दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक सुखावणार असला तरी साखर कारखान्यांना याचा काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे देशातून सुमारे ९५ लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य होते. ती आता जास्तीत जास्त १०० लाख टन होईल. त्यामुळे निर्यातबंदीचा फारसा परिणाम होणार नाही, असे साखर आयुक्तलयाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे १०० लाख टन साखर निर्यातीचा कोटा संपल्यानंतर पुढील निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. त्यापैकी ७५ लाख टन साखर यापू्र्वीच निर्यात झाली आहे. उर्वरित १० लाख टन साखरेचे करार पूर्ण होऊन ती जहाजांमध्ये पोहोचली आहे किंवा त्या स्थितीत आहे.

COMMENTS