पारनेर : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर विक्री केल्याचा प्रताप राज्य सह

पारनेर : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर विक्री केल्याचा प्रताप राज्य सहकारी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे . या प्रकरणात पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांसह क्रांती शुगर कंपनीच्या नऊ संचालकांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास चालु असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीना करीता अहमदनगर सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तो येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोने यांनी फेटाळून लावला आहे .
याप्रकरणी अधिक माहिती अशी की , पारनेर सहकारी साखर कारखान्यावर साडेचौदा कोटींच्या एका बनावट गहाणखताने कर्जाचा फुगवठा दाखवून राज्य सहकारी बँकेने, पुणे येथील क्रांती शुगर प्रा. लि. कंपनीला या कारखान्याची मालमत्ता विक्री केली होती . त्यानंतर या प्रकरणी कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले होते. या गुन्ह्यातील आरोपींनी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरून खरेदीखत नोंदणी केलेले आहे . बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडेचौदा कोटीचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा दाखवला आहे, कारखाना विक्रीच्या खरेदीखताला सुमारे विस कोटींचा बोजा लपवलेले सोळा बनावट सातबारा जोडले आहेत . पारनेर साखर कारखाना विक्रीची बेकायदा निविदा काढून एकाच कंपनीला फायदा होईल अशी संपूर्ण विक्रीची प्रक्रिया राबवली, विक्रीसाठी
आरोपींशी संगनमत करून त्यांच्या कडील कर चुकवलेला काळा पैसा चलनात आणला. पुढे आरोपींना त्याच मालमत्तेवर सुमारे तिनशे कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला आहे . यापुर्वी आरोपींची रिव्हीजन याचिका सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असणारे राज्य सहकारी बँकेचे माजी सर व्यवस्थापक आणि नागपुर जिल्हा सहकारी बॅकेचे विद्यमान प्रशासक अनंत भुईभार आणि कर्ज वितरण प्रमुख अनिल चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अहमदनगर सत्र न्यायालय नुकताच फेटाळला आहे. आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा,आर्थिक अपहार, विश्वासघात, फसवणूक आणि बनावटगिरीशी निगडित असल्यामुळे या गुन्ह्याचे तपास कामी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. पारनेर कारखाना कारखाना बचाव समितीच्या वतीने अँड. रामदास घावटे, अँड. सुदाम साठे,अँड. उन्मेश चौधरी, अँड. सोमनाथ गोपाळे यांनी बाजू मांडली.
सुप्रिया सुळेंच्या कंपनीचा सहभाग …!
पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळ्यातील क्रांती शुगर कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले व ईतर संचालक हे राष्ट्रवादि कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. क्रांती शुगर कंपणीला पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी पैसा पुरवठा करणारे पुणे येथील उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडीया यांच्याकडून सुमारे बावीस कोटी रुपये, तर अक्षर लॅण्ड डेव्हलोपर्स कंपनी कडुन नऊ कोटी रुपये रकमांचा पुरवठा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे, त्यापैकी अक्षर लॅण्ड डेव्हेलोपर्स कंपनीत सुप्रीया सुळे या भागीदार होत्या. तसेच या व्यवहारात पैसा पुरवणारे पुण्याचे चोरडीया बंधु आणि माजी खासदार विदुरा नवले हे शरद पवार व सुप्रीया सुळे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे पोलिस तपासात राजकीय दबाव व हसक्षेप होत आहे. असे बचाव समितीचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे ]

COMMENTS