Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुदर्शन आठवले यांना २०२४चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. ०९ : साहित्य अकादमीने 2024 साठीच्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा असून, मराठी भाषेसाठी हा सन्मान सुदर्शन आठवले यांना जाहीर करण्य

गांधार भूमीतील अशांततेचा वणवा
पोलिसांना मिळणार 12 ऐवजी 20 दिवसाच्या किरकोळ रजा : ना. शंभूराज देसाई
वेश्यांसाठी आलेल्या अनुदानात अपहार ; नगरच्या प्रसिद्ध संस्थेविरोधात तक्रार

नवी दिल्ली, दि. ०९ : साहित्य अकादमीने 2024 साठीच्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा असून, मराठी भाषेसाठी हा सन्मान सुदर्शन आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी गुरचरण दास लिखित इंग्रजीतील ‘द डिफिकल्ट ऑफ बींग गुड’  ( ‘The Difficulty of Being Good’ ) या साहित्यिक समीक्षेचा उत्कृष्ट मराठी अनुवाद केला आहे.

साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक रवींद्र भवन, येथे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 2024 साठीच्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारांसाठी 21 भाषांतील पुस्तकांची निवड करण्यात आली.

परीक्षक मंडळ व पुरस्काराविषयी

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी प्रत्येक भाषेसाठी तीन सदस्यीय परीक्षक मंडळ कार्यरत असते. मराठी भाषेसाठी परीक्षक मंडळात निशिकांत ठाकूर, प्राची गुजरापध्याय-खंडेपारकर आणि निशा संजय डांगे यांचा समावेश होता.

या पुरस्कारांतर्गत ₹50,000/- रोख रक्कम आणि ताम्र प्रशस्तीपत्र प्रदान केले जाते. हा सन्मान लवकरच एका विशेष समारंभात दिला जाईल. सुदर्शन आठवले यांचा मराठीत सखोल अभ्यास असून, त्यांनी इंग्रजीतील महत्त्वपूर्ण साहित्य मराठीत आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

COMMENTS