Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवा नेते प्रतीक पाटील यांच्या लग्नाची जय्यत तयारी

इस्लामपूर / प्रतिनिधी : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव

पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी
’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
दोन दिवसात दाखला देण्याचा पाटण तहसिलदारांचा अभिनव उपक्रम

इस्लामपूर / प्रतिनिधी : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शुभ विवाह राजारामनगर (इस्लामपूर) येथे रविवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी 5.35 वाजता होत आहे. या लग्न सोहळ्यास वाळवा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून अनेक मंत्री, आमदार, खासदार, मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
इस्लामपूर-बहे रस्त्यावर राजे बागेश्‍वरच्या पूर्वेस लग्न सोहळ्याची भव्य व सुंदर व्यवस्था केली आहे. इस्लामपूर-बहे रस्त्याच्या बाजूलाच मुख्य प्रवेश उभा केलेले आहे. राजाराम बापू इनडोअर स्टेडियमच्या मागे पश्‍चिमेस तोंड करून देऊळ, घंटा व फुलांच्या चित्रांनी सजविले भव्य व्यासपीठ उभा केलेले आहे. व्यासपीठाच्यासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था केली असून महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. त्याचा मागे सर्व निमंत्रितांची बैठक व्यवस्था केलेली आहे. हा सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून 8 एलई डी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. विशेष मान्यवरांनी राम मंदिराकडून तर निमंत्रितांनी इस्लामपूर-बहे रस्त्याकडून प्रवेश करावा, अशी व्यवस्था केलेली आहे. शेजारच्या बियाणे मळा परिसरात पंगत व बफे पध्दतीने भोजन व्यवस्था केलेली आहे. एकावेळी 5 हजार लोकांची भोजन व्यवस्था केली आहे.
हा लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी दिलीपराव पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, सुरेंद्र पाटील, देवराज पाटील, दादासो पाटील, संजय पाटील, आर. डी. सावंत, आर. डी. माहुली, एस. डी. कोरडे यांच्यासह राजारामबापू उद्योग समूह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आ. जयंतराव पाटील यांच्या कुटूंबातील सदस्य नियोजन करत आहेत.

COMMENTS