Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या यात्रेची आमदार काळेंकडून जय्यत तयारी

कोपरगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार (दि.08) पासून जनसन्मान यात्रा काढली आह

पालखेड डाव्या कालव्यातून पाझर तलाव व बंधारे भरून द्या
पालखी सोहळ्यातून राजमुद्रा प्रतिष्ठाणने धार्मिक परंपरा जपली
शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या

कोपरगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार (दि.08) पासून जनसन्मान यात्रा काढली आहे. राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार (दि.10) रोजी दुपारी 3.30 वाजता कोपरगाव शहरात येणार आहे. या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून राष्ट्रवादीचे झेंडे, स्वागताचे होर्डिंग्सने संपूर्ण कोपरगाव शहर राष्ट्रवादीमय झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरुवार (दि.08) पासून सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरु झालेली हि जनसन्मान यात्रा शनिवार रोजी कोपरगाव मतदार संघात येत आहे. मतदार संघातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील बेटातील पुलावर या यात्रेचे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आ.आशुतोष काळे स्वागत करणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यातील पदाधिकारी तसेच आ.आशुतोष काळे यांची जनसन्मान यात्रेच्या बसमधून श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिरापासून श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत या जनसन्मान यात्रेचे मतदार संघातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे, होर्डिंग व अजितदादा पवार यांच्या स्वागताचे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. ना.अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे.जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून ते राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत. कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चरीटेबल ट्रस्टच्या सभागृहात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात मतदार संघातील माता भगिनींशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संवाद साधून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना राबविलेल्या अनेक महत्वाच्या जन कल्याण योजनांबाबत हितगुज करणार आहेत. या महिला मेळाव्यासाठी मतदार संघातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

COMMENTS