Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोपरगांव येथील संजीवनी युवा

दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना
मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेवर बिबट्याचा हल्ला | DAINIK LOKMNTHAN
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोपरगांव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने 10 जानेवारी रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या प्रतिष्ठानने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धमध्ये लहान गटात के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. त्रिभुवन स्नेहल बापू हिने प्रथम क्रमांक (रोख रक्कम 5000 रू, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र), बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कु.डंग मेघा संजय हिने द्वितीय क्रमांक (  रोख रक्कम 3000 रू, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र) तर अकरावी कला शाखेतील विद्यार्थी निंबाळकर रामेश्‍वर ज्ञानेश्‍वर यांने तृतीय क्रमांक (रोख रक्कम 2100 रू, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र) पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे विश्‍वस्त श्री.संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे, रजिस्ट्रार अभिजीत नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. सूर्यवंशी ए. एफ., प्रा. जाधव डी.जे., प्रा. बुधवंत डी. एस., प्रा. भोंडवे जे. आर., प्रा. मोरे बी.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS