नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेंतर्गत राबविला जाणारा एम. एस्सी. (पर्यावरणशास्त्र) या शिक्षणक्रमाचे पुढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेंतर्गत राबविला जाणारा एम. एस्सी. (पर्यावरणशास्त्र) या शिक्षणक्रमाचे पुढील पाच विद्यार्थी – प्रियदर्शनी महादेव बाऊस्कर, गौरव संजय राणे, पंकज प्रल्हाद घारपिंडे, प्रमोद प्रकाश जगताप, पुजा बाबाजी शिरढोणे यांनी दिनांक 7 एप्रील 2024 मध्ये सहाय्यक प्राध्यापकांसाठी सावित्रीफुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी (M-SET) परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची समजल्या जाणाऱ्या सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ह्या यशाबद्दल कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी अभिनंदन केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमास प्रवेश घेऊन यश संपादन करावे असेही आवाहन केले. सदर पाचही विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय या अभ्यासकेंद्राचे आहे, अभ्यास केंद्र संयोजक डॉ. सुनील भोसले, आणि केंद्रप्रमुख प्रा. आर आर कुंभार अशी माहिती विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेच्या प्र. संचालक, डॉ. चेतना कामळस्कर यांनी दिली.
COMMENTS