Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश

जुन्नर ः तालुक्यातील वामन पट्टयातील शेतकरी दत्तात्रय वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक

मखमलाबाद परिसरात तब्बल तीन बिबटे ; नागरीकांमध्ये दहशत 
Sangamner : धांदरफळ खुर्द मध्ये बिबट्याचे दर्शन (Video)
दैव बलवत्तर म्हणून बिबट्यापासून वाचला जीव

जुन्नर ः तालुक्यातील वामन पट्टयातील शेतकरी दत्तात्रय वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक सुमारे सहा वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद झाली असल्याची माहिती ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. सदर बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात वनपाल संतोष साळुंखे, वनसहायक रोशन नवले, बाबाजी खर्गे यांनी हलविले. काळवाडी येथील आठ वर्षीय मुलगा खेळत असताना ,पिंपरी पेंढार येथील महिला बाजरीच्या पिकाची राखण करताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले होते. तसेच पिंपळवंडी येथील एक तरुणी शेतात काम करत असताना गंभीर जखमी झालेली होती. या घटने नंतर वनविभागाने या परिसरात 30 पिंजरे लावलेले होते. काळवाडी, पिंपळवंडी व पिंपरी पेंढार या गावात मागील आठ दिवसात एकुण सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले आहे. सहा बिबटे जेरबंद झाल्यानंतर देखील नागरिकांना बिबट्यांचे दर्शन वेगवेगळ्या भागात होत असल्याने ते भयभित झालेले आहेत.हल्ल्याच्या सर्व घटना या सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेस झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभाग करत आहे.तसेच मानव बिबट सहजीवन या संदर्भात वनविभाग गावांतील वाडी वस्तीवर जाऊन बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करत आहेत. 

COMMENTS