Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तव्यदक्षतेला मिळाले यश; संजय वडमारे (राजाभाऊ) यांची पीएसआय पदावर पदोन्नती

बीड । प्रतिनिधीबीड जिल्हा पोलीस दलात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता व जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले संजय वडमारे

जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?
वाळूतस्करांनी पोलीस कॉन्स्टेबलला टेम्पोखाली चिरडले (Video)
चक्क पोलिस कर्मचाऱ्याने लुटले तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये
Displaying 1.jpg

बीड । प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस दलात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता व जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले संजय वडमारे (राजाभाऊ) यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
ही पदोन्नती बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पांडकर उपस्थित होते. त्यांच्या पदोन्नतीनंतर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस दलात कार्यरत असताना संजय वडमारे यांनी विविध जबाबदार्‍या अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने पार पाडल्या आहेत. गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांशी सौहार्दपूर्ण संवाद ठेवत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, मेहनत व शिस्तबद्ध सेवेमुळेच त्यांना ही पदोन्नती मिळाल्याची भावना सहकार्‍यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रामाणिक सेवा आणि कर्तव्यदक्षतेचे हे फळ आहे, अशा शब्दांत अनेकांनी त्यांचा गौरव केला. संजय वडमारे (राजाभाऊ) यांच्या पदोन्नतीमुळे बीड जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS