पंढरपूर ः महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात सध्या सुशोभीकरणाचे काम असतांना शुक्रवा
पंढरपूर ः महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात सध्या सुशोभीकरणाचे काम असतांना शुक्रवारी मंदिर परिसरात कानोपात्रा मंदिराजवळ भुयार आढळून आले आहे. सात-ते आठ फुटाचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून आतमध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या संवर्धन तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी 73 कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुने रुप समोर आणले जात आहे. अशातच मंदिर परिसरातील कानोपात्रा मंदिराजवळ अंतर्गत भुयार आढळून आले. सात ते आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये मूर्ती असण्याची शक्यता आहे. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली असून पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदीरात पोहोचले आहेत. दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत
COMMENTS