Homeताज्या बातम्यादेश

प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोत तरुणीची स्टंटबाजी

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ली मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओंमध्ये कधी कोणी नाचताना तर कोणी

हिंदूचा झाला मुस्लिम… मग सुरु केले धर्मांतरणाचे रॅकेट… युपी एटीएसने घेतले ताब्यात…
विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ली मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओंमध्ये कधी कोणी नाचताना तर कोणी विचित्र हावभाव करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. सततच्या या रीलमुळे दिल्ली मेट्रो चर्चेत असते. आता पुन्हा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी मेट्रोत स्टंट करताना दिसत आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रोमध्ये रील शूट करणाऱ्यांना अनेक इशारे देऊनही, लोक मेट्रो स्टेशन आणि ट्रेनच्या आतमध्ये रील आणि व्हिडिओ शूट करणं बंद करत नसल्याचं दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मेट्रोच्या आतमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रील करणं लोक कधी थांबवणार असा प्रश्नही काही नेटकरी विचारत आहेत.

खरं तर, दिल्ली मेट्रोतील असे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक मुलगी मेट्रोच्या आत प्रवाशांसमोर स्टंट करताना दिसत आहे. या स्टंटचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘हे बेकायदेशीर झाले आहे. आता हे सर्व मेट्रो किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत करा. सांभाळून, तसेही चांगले केले.” शिवाय अनेक नेटकऱ्यांना या मुलीचा स्टंट आवडल्याचंही पाहायला मिळत आहे, कारण अनेकांनी तिचं कौतुक करणाऱ्या कमेंट या व्हिडीओवर करत आहेत. नुकतेच दिल्ली मेट्रोने प्रवाशांना मेट्रोने प्रवास करताना शिस्त आणि शिष्टाचार राखण्याचे आवाहन केले होते, तरीही काही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नसल्याचं दिसत आहे. डीएमआरसीने एका निवेदनात म्हटले होते, ‘सर्व प्रवाशांनी त्यांच्या वर्तनामुळे सहप्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.’

COMMENTS