कर्जत /प्रतिनिधी ः विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही अंधश्रद्धेचा त्याग करून विज्ञानाची कास धरावी. विज्ञान हे जीवनाच्या अवती-भवतीच असते. त्याची तर्काच
कर्जत /प्रतिनिधी ः विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही अंधश्रद्धेचा त्याग करून विज्ञानाची कास धरावी. विज्ञान हे जीवनाच्या अवती-भवतीच असते. त्याची तर्काच्या आधारावर मांडणी करून त्याचा अंगीकार करावा. असे आवाहन भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.प्रवीण सप्तर्षी यांनी केले. खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने शिक्षकदिन कार्यक्रमात ते बोलत होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीपसिंह निकुंभ,उपप्राचार्य डॉ.धर्मेंद्र साळवे, ’युक्रांद’चे अप्पा अनारसे मंचावर उपस्थित होते. यावेळी अप्पा अनारसे म्हणाले की, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची चळवळ सुरू केली. बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरा सोडून विज्ञानवादाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रा.शाहूराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन हर्षदा सोनवणे हिने केले. प्रा.संदीप काळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS