कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुल येथे शै

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुल येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातील कानाकोपर्यातून विद्यार्थी आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.
निवासी शाळेमध्ये सोयी सुविधांच्या बाबतीत अव्वल असलेल्या गौतम पब्लिक स्कूल ने जपलेला शैक्षणिक दर्जा व क्रीडा क्षेत्रात असलेला दबदबा यामुळे गौतम पब्लिक स्कूलचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कला, गुणवत्ता व अजोड बुध्दीच्या जोरावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे दरवर्षी गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागते. याहीवर्षी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी केल्यामुळे संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 3 री ते 8 वी पर्यंतच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेला देखील राज्यातील मुंबई, ठाणे, भिवंडी, सोलापूर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, जालना,नांदेड,परभणी,सोलापूर,सांगली,सातारा,पुणे,धाराशिव आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ’प्रवेश परीक्षा’ पार पडली. यावेळी शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात येणार्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा रम्य परिसर व विस्तीर्ण क्रीडांगण, स्विमिंग पूल आदी सुविधांबरोबरच रुचकर जेवणाचा आस्वाद घेवून प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक पूर्तता करून या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.
COMMENTS