Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी सर्पमित्रांकडून घेतली सापांची माहिती

शेवगाव तालुका ः सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय

राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात
कोरोना वॅक्सिन घेताना हार्ट अटॅक आला… आणि सुपरस्टार ‘स्टार’ झाला |’Filmi Masala’| LokNews24
व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या

शेवगाव तालुका ः सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर- घुशी खाते. सापाचे उंदीर पकडण्याचे तंत्र परिणामकारक आहे. नागपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्पाची माहिती व्हावी यासाठी सर्पमित्र संतोष लाकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.नागपंचमीच्या पर्वावर विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून सापांची माहिती आणि घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्पविषयाची माहिती जाणून घेतली.या व्याख्यानाचे आयोजन रेसिडेन्शिअल हायस्कूलमधील राष्ट्रीय हरित  विभाग  सेना प्रमुख नितीन भुसारी  यांच्या संकल्पनेतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सर्पमित्र संतोष लाकडे गेल्या बारा वर्षापासून सर्प जनजागृती तसेच सर्वांना सुरक्षित रित्या पकडून निसर्गात सोडण्याचे काम करत आले आहे. सर्प हा निसर्गातील प्रमुख घटक असून सर्पांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. सर्पमित्र संतोष लाकडे हे रात्री अपरात्री नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच उपस्थित असतात नागरिकांच्या घरातले साप पकडून विनामूल्य ते त्या सापांना  निसर्गात सोडण्याचे काम करत आहेत. त्यांच्या सहकार्यासाठी सर्पमित्र विशाल गोरे तसेच सर्पमित्र साहिल शेख हे नेहमीच उपस्थित असतात. नागरिकांच्या घरात साप निघाल्यास आपण 7620653623 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संतोष लाकडे यांनी केले आहे.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड पर्यवेक्षक देविदास सोनटक्के, सर्पमित्र संतोष लाकडे, सर्पमित्र साहिल शेख , विशाल गोरे योगेश झेंडे, नितीन भुसारी तसेच संतोष मिसाळ, प्रमोद कानडे, दिपक ढोले, प्रशांत फलके तसेच इयत्ता नववी व इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या व्याख्यानाचे प्रास्तविक रामनाथ काळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर आभार नितीन भुसारी यांनी मानले. 

COMMENTS