पुणे : पुण्यातील एका शाळेत नववीतील विद्यार्थ्यांने किरकोळ वादातून आपल्याच मित्राचा काचाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. हा 15 वर्ष

पुणे : पुण्यातील एका शाळेत नववीतील विद्यार्थ्यांने किरकोळ वादातून आपल्याच मित्राचा काचाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. हा 15 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मांजरी परिसरातील एका शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, वार्षिक समारंभाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका 14 वर्षीय दोषी मुलाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS