Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनसेवा प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर इस्लापूरच्या विध्यार्थ्या ची समर नॅशनल अबॅकस स्पर्धेत गरुड झेप.

किनवट प्रतिनिधी - तालुक्यातील इस्लापूर या अतिदुर्गम भागातील विध्यार्थ्यांना  धनलाल राठोड सरांनी अबॅकस चे प्रशिक्षण देऊन आपल्या सेंटरचे व गावाचे

अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी साधला आस्थेवाईकपणे संवाद
आदित्य चोपडा याचा घातपात… चौकशी करण्याची आमदारांची मागणी
विद्युत मोटार आणि केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

किनवट प्रतिनिधी – तालुक्यातील इस्लापूर या अतिदुर्गम भागातील विध्यार्थ्यांना  धनलाल राठोड सरांनी अबॅकस चे प्रशिक्षण देऊन आपल्या सेंटरचे व गावाचे नाव गाव पातळीवरच नाही तर नॅशनल लेवल पर्यंत लौकिक केले.
छत्रपती संभाजीनगर येथे 25 जून रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये जनसेवा प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर इस्लापूरच्या विध्यार्थ्यानी यश संपादन केले. जनसेवा प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर इस्लापूरच्या 20 विध्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग नोंदवून 03 विध्यार्थ्यानी विनर ट्रॉफी  आणि 17 विध्यार्थ्यानी फायनल लिस्ट मधून ट्रॉफी मिळवले. 6 मिनिटात 100 गणित सोडवणे असे स्पर्धेचे स्वरूप होते.स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे, वर्गमूळ अशा अनेक गणितीय क्रिया करत अबॅकसमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विध्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडण घडणीत मोलाची भर पडत असते. या स्पर्धेत स्मित सचिन येरावार ( द्वितीय क्रमांक), कार्तिकी विद्यासागर हाजारे ( तृतीय क्रमांक), वैष्णवी विश्वासराव गंदेवार ( पाचवा क्रमांक)हे विध्यार्थी मराठवाडा विभागातून त्याच्या वर्गानुसार ट्रॉफी चे विनर ठरले.  1)संस्कृती साहेबराव महेत्रे,2) आराध्या बालाजी पळसपुरे,3) नारायणी अमोल तगलपल्लेवार,4) रुजूल मोहन गोनेवार,5) आरुषी भगवान इटकरे,6) जयप्रसाद व्यंकटेश बदूलवार,7) अभिजीत भगवान इटकरे,8) अवनी व्यंकटेश बदुलवार,9) ईश्वरी संजीव कासारे,10) वेदांत सतीश तुप्तेवार,11) सर्वेश श्रीधर पदमावार,12) अर्णव अमोल लाभशेटवार,13) वरद संतोष भूषमवार,14) गौरी शेषराव गंदेवार,15) समर्थ शैलेश जयस्वाल,16) पियुष संजय पदमावार,17) किंजल अमोल लाभशेटवार या सर्व विध्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरी करत  फायनल लिस्ट मधून ट्रॉफी  मिळवले तसेच जनसेवा प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर इस्लापूरचे संचालक  धनलाल राठोड सर यांना छत्रपती संभाजी नगर येथे  बेस्ट सेंटर हा विशेष पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले व त्याचे सर्वत्र वाव होत आहे सदर स्पर्धेत मराठवाडा विभागातून 10 जिल्यातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता.

COMMENTS