Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव- भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आजपासून सीबीएससी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दु

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?
रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक

जळगाव- भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आजपासून सीबीएससी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सुयोग भूषण बडगुजर वय 13 वर्ष असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो भोवळ येऊन खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुयोग हा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आज शाळेचा पहिला दिवस होता. तो शाळेत गेला. मात्र त्यानतंर काही वेळातच त्याला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या निधनानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS