एसटीचा संप चिघळला ; अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीचा संप चिघळला ; अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

मुंबई ः एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी मंगळवारी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. संपकर्‍यांनी

हिसाब तो लेकर रहेंगे, किरीट सोमय्या यांच अनिल परब यांना प्रत्युत्तर 
प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
अखेर रिंकूसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर आकाश ठोसरनं सोडलं मौन

मुंबई ः एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी मंगळवारी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. संपकर्‍यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी धरणे आंदोलने करत त्यांच्या निवास स्थानावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्यशासनामध्ये करण्यात यावं अशी एसटी कर्मचार्‍यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. विलिनीकरणाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. मात्र तरी आंदोलनकर्ते कर्मचारी संपावर ठाम आहेत. अनेक कर्मचार्‍यांचं निलंबनही करण्यात आलं आहे, मात्र तरीही एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. अनिल परब यांनी या संपाच्या मुद्द्यावर सोमवारी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे या संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र या बैठकीसंदर्भात अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही.
शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचार्‍यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचार्‍यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही. मात्र, एसटी कर्मचार्‍यांना घसघशीत पगारवाढ द्यावी, असा सल्ला पवारांनी दिल्या.

शरद पवारांनी केल्या सूचना
एसटी कर्मचार्‍यांना घसघशीत पगारवाढ द्या
कनिष्ठ ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचार्‍यांना लाभ मिळावा
आर्थिक ताण सहन करण्यासाठी वर्षभराची तरतूद करावी

COMMENTS