विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?

चव्हाण, डॉ. राऊत यांची नावे ही चर्चेत ; 28 डिसेंबर रोजी निवडणूक

मुंबई : काँगे्रस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून अध्यक्षपद रिकामेच आहे. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्य

आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
हजारो महिलांसोबत नवनीत राणां यांनी हनुमान चालीसा पठन

मुंबई : काँगे्रस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून अध्यक्षपद रिकामेच आहे. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती, मात्र सत्ताधार्‍यांनी दगाफटका होऊ नये, यासाठी पावसाळी अधिवेशनात वेळ मारून नेली. मात्र अध्यक्षपद जास्त काळ रिक्त ठेवता येणार नसल्याची जाणीव असल्याने, 28 डिसेंबर रोजी या पदासाठी निवडणूक होत आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे. अध्यक्षपद काँगे्रसच्या वाटयाला असल्यामुळे साहजिकच काँगे्रसच्या उमेदवाराची वर्णी या पदावर लागणार आहे. काँगे्रसचे संग्राम धोपटे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या पदासाठी चर्चेत असले तरी कुणाच्या पदरात ही माळ पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. येत्या 28 डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. 27 डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चा थोपटे यांच्या नावाची आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे कळते.

कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम नारायण थोपटे हे 38 वर्षाचे आहेत. ऐन तरुण वयातच त्यांना विधानसभेवर जाता आले. त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणे, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. पुण्यातील भोर हा त्यांचा विधानसबा मतदारसंघ. बीएपर्यंत शिक्षण घेतलेले थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. भोरमध्ये गेल्या चार दशकांपासून थोपटे पितापुत्रांची सत्ता आहे. ‘भोर म्हणजे थोपटे’ व ‘थोपटे म्हणजे भोर’ हे समीकरण झालेले आहे. चौरंगी लढत असो की थेट सामना असो थोपटे यांनी प्रत्येक आव्हान पलटवून लावले आहे.

COMMENTS