Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव दगडफेकीचा राहुरीत निषेध

राहुरी/प्रतिनिधी ः शेवगाव मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकानी दगडफेक केली, अशा घटना दोन समाजामध्ये हिंसक वळ

अपयशावर मात करून ध्येय साध्य करावे ः प्रा. रामचंद्र राऊत
Sangamner : ज्यांनी आकडे लपवले त्यांची स्मशानभूमी लपली नाही – ना.थोरात
रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

राहुरी/प्रतिनिधी ः शेवगाव मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकानी दगडफेक केली, अशा घटना दोन समाजामध्ये हिंसक वळण निर्माण करण्याचे काम करत आहे. तसेच शासनाने आशा लोकांनावर कठोर शासन करावे व अशा दगडफेकीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी तालुका जाहीर निषेध केला.
या प्रसंगीचे निवेदन राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे याना देण्यात आले. त्याप्रसंगी ज्ञानेश्‍वर गाडे सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष भाऊ उंडे, तालुका अध्यक्ष मनोज जाधव, वाहतूक जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते, राजू आढागळे वाहतूक शहराध्यक्ष, मनवीसे तालुकाध्यक्ष सागर माने बंटी क्षीरसागर, विकी पातोरे आदी मनसेसैनिक उपस्तिथ होते.

COMMENTS