प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी  प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

माटुंगा येथील बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी

मुंबई - प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम व कौशल्यपूर्ण  शिक्षण देण्यासाठी  महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच

अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील
जेव्हा कायदाच दुर्लक्षित केला जातो……! 
एचएएलच्या नावाने लोकांना भडकवण्यात आले ः पंतप्रधान मोदी

मुंबई – प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम व कौशल्यपूर्ण  शिक्षण देण्यासाठी  महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो अशी मनोकामना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. माटुंगा येथील   बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते. दिवाळीनिमित्त महिला बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  माटुंगा येथील   द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन व श्रद्धानंद बालगृह या संस्थांना भेट दिली. यावेळी महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  शोभा शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी, बालगृहातील मुलांना  दिवाळीनिमित्त  शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, अशी  मनोकामना व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक बालकाला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी  महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून  विविध योजना राबविण्यात येत आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचेही  मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास आयुक्त आर.विमला प्रास्ताविक करताना म्हणाल्या, या संस्थेत एकूण 102, श्रद्धानंद महिला वसतिगृह येथे १२८ मुली आहेत. या मुलांच्या प्रवेश प्रक्रिया, मोफत शालेय शिक्षण, मुलांसाठी विशेष शिक्षणाची व्यवस्था, विविध शिवण वर्ग,वाचनालय, उद्यान कला, मैदानी खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सण साजरे करणे, शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहलीचे आयोजन यांसारख्या संस्थेच्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

COMMENTS