Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई ः मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी तीव्र केला असून, आरक्षणामध्ये सगे-सोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. गेल्या 5

नितेश राणेंच्या गाडीला अपघात.
तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना
निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीला वेग

मुंबई ः मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी तीव्र केला असून, आरक्षणामध्ये सगे-सोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून ते उपोषण करत असून, यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असली तरी, त्यांनी सगे-सोयर्‍याची अंमलबजावणीचा आदेश येईपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका घेती आहे. मात्र राज्य सरकार संवेदनशील असून, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणा संदर्भात देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज दोन्ही समाजाशी समन्वय साधण्यात येत असल्याचेफडणवीस यांनी सांगितले. आपण स्वतः या संदर्भात ओबीसी नेत्यांची चर्चा केली असून मराठा समाजाला सगेसोयरेतून आरक्षण दिल्याने ओबीसींचे काहीही नुकसान होणार नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान त्यांनी अन्न-पाणी देखील घेतलेले नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचे हे आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडते का? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जातो आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयाच्या भूमिकेतून सरकार काम करत असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात राज्य सरकार गंभीर्याने विचार करत आहे. त्यांना सरकारच्या वतीने दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहे. जाळपोळ व्यतिरिक्त मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू आहे. तसेच सगेसोयरे संदर्भातली पहिली नोटिफिकेशन राज्य सरकारने जारी केली आहे. या संदर्भात आक्षेप मागवण्यात आले आहेत. तसेच ओबीसी नेत्यांशी देखील मी स्वतः चर्चा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सगे-सोयर्‍याच्या अंमलबजावणीसाठी ओबीसी नेत्यांशी चर्चा – राज्यात मराठा आरक्षणासाठी सगे-सोयर्‍याच्या अंमलबजावणी आम्ही ओबीसी नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. यासंदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी नेते असतील, या सर्वांशी आम्ही चर्चा करत आहोत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात कोणतेही नुकसान होणार नाही. हे देखील त्यांना समजून सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या संदर्भात सरकार संवेदनशील आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठा असो किंवा ओबीसी असो सर्व समाजातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन त्यांना सरकारची भूमिका पटवून देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

COMMENTS