आष्टी प्रतिनिधी - पञकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस

आष्टी प्रतिनिधी – पञकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने आष्टी तहसिल कार्यालयासमोर पञकार संरक्षण कायद्याच्या प्रतची होळी करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे पाचो-याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या आंदोलनात शहरांसह तालुक्यातील पञकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनाचे निवेदन नायब तहसिलदार बाळदत्त मोरे यांच्याकडे देण्यात आले.पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,पञकार हल्याचे खटले जलदगती न्यायालया मार्फत चालवली जावेत,पाचोरचे आ.किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी.आदी मागण्यासाठी आष्टी तहसिल कार्यालयासमोर पञकारांनी एकञीत येऊन आंदोलन केले.यावेळी पञकार संरक्षण कायद्याच्या प्रतची जाहिर होळी करण्यात आली शासनाने पञकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कडक अमंलबजावणी करावी.अशी यावेळी मागणी करण्यात आली.तहसिल परिसर पत्रकारांनी दिलेल्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख,पत्रकार जावेद पठाण,पत्रकार आण्णासाहेब साबळे,जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे,संतोष तागडे,अतुल जवणे,गहिनीनाथ पाचबैल,संतोष नागरगोजे,अक्षय विधाते,प्रेम पवळ,अमोल जगताप,तुकाराम भवर,शहानवाज पठाण,किशोर निकाळजे,अशोक मुटकुळे, विपुल सदाफुले,दादासाहेब पवळ,समीर शेख,राजु मस्के आदी सहभागी झाले होते.
COMMENTS