Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस खते, बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार ः राज्य सरकार करणार समिती स्थापन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस खते, बियाण्याच्या तक्रारी आल्या असून, याचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. यावर बोलतांना उपम

कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक
शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका
शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस खते, बियाण्याच्या तक्रारी आल्या असून, याचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. तसेच कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. 164 मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. बोगस खते, बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
यासंदर्भात बोलतांना अजित पवार म्हणाले की, बोगस बियाणेप्रकरणी 22 पोलिस केसस दाखल करण्यात आल्या आहेत. 20 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. खतांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाने 190 टन साठा जप्त केला आहे. त्यासंदर्भात 13 पोलिस केसेस दाखल करण्यात आले आहे. 52 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी सांगितले की, मागील कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री, पाणीपुरवठामंत्री अशी एक समिती करण्यात आली आहे. मात्र, कारवाईचे मागील कायदे लक्षात घेता बोगस खते व बियाणे विक्री करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जात नव्हती त्याकरीताच ही समिती करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपायच्या आत कडक कायदा आणला जाईल व बोगस खते व बियाणे विकणार्यांवर नियंत्रण आणण्याचे काम राज्यसरकार करत आहे, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना दिला.

उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट – विधिमंडळात ठाकरे गटाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राज्याच्या आर्थिक चाव्या आल्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत माहिती असल्याने जनतेना योग्य न्याय मिळेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी राज्यासाठी चांगले काम करावे, कारण सत्तेसाठी साठमारी सध्या राज्यात सुरू आहे. राज्यातील प्रश्‍न, शेतकर्‍यांचे प्रश्‍न असो असे सर्व विषयावर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवारांनी अडीच वर्षे माझ्यासोबत काम केले असून त्यांचा स्वभाग आणि काम करण्याची पद्धत मला माहिती असल्याने मी खात्रीने सांगतो ते जनतेसाठी काम करतील. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे यांनी पक्ष सोडत भाजपला साथ का दिली असे त्यांनी म्हटले आहे. आपला धृतराष्ट्र नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS