Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारच्या त्रिशंकू भागातील पथदिवे दोन दिवसापासून बंद

सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा परिणाम; नवमतदारांना खुष ठेवण्याऐवजी जिरवा-जिरवीचे राजकारणसातारा / प्रतिनिधी : सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नव्यान

पाच लाखांची लाच घेताना ’ग्रामसेवक’ लाचलुचपतच्या जाळ्यात
तांबवेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सलग तिसर्‍या वर्षी विक्रमी रक्तदान
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर

सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा परिणाम; नवमतदारांना खुष ठेवण्याऐवजी जिरवा-जिरवीचे राजकारण
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नव्याने समावेश झालेल्या परिसरातील नवमतदारांना खूष ठेवण्यापेक्षा जिरवा-जिरवीचे राजकारण सुरु झाले आहे. हद्दवाढीनंतर सोयी-सुविधा देण्यापेक्षा त्यांना तिष्ठत ठेवण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. हद्दवाढीचे परिणाम नवमतदारांना सोसावे लागत आहेत. नवमतदारांना खुष ठेवण्याऐवजी जिरवा-जिरवीचे राजकारण सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून त्रिशंकू भागातील पथदिवे बंद पडले आहे.
सातारा शहरात नव्याने समावेश झालेल्या भागातील नव मतदारांची जिरवण्याचे नियोजन सातारा नगरपरिषदेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सुरु केले आहे. त्याचा पहिला प्रयोग म्हणून जीवन प्राधिकरणाचे चार भिंतीवरील पाण्याच्या टाकीतील पाणी कोटेश्‍वर मंदिर परिसरातील लोकांसाठी पळवून नेण्यास सुरुवात केली. दुसरा प्रयोग म्हणून नव मतदारांना भुलविण्यासाठी नेत्यांच्या उपस्थितीत विकास कामांचा डोंगर असून त्याचा शुभारंभ करण्याचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भर म्हणून विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील पथदिवे नगरपारिषदेच्या फिडरला नुकतेच जोडण्यात आले. मात्र, गेल्या दोन दिवसापासून गोडोली तसेच शाहुनगर, मंगळाई कॉलनी यासह त्रिशंकू भागातील पथदिवे बंद ठेवण्यात आले आहेत. अर्थात निवडणूकीच्या तोंडावर नेत्यांना मताधिक्य कमी दिलेल्या भागातील लोक मुळचे सातार्‍यातील नसून ते नोकरी-व्यावसायानिमित्त वास्तव्यास आहेत. अर्थात कालांतराने ते त्या भागातील मतदार बनले आहेत. आता हे मतदार नगरपरिषदेच्या आगामी निवडणूकीत आपली चूणूक दाखवून सातारच्या मेहरबानांना जेरीस आणणार आहेत, याची कल्पना आली आहे. त्यामुळे या परिसरात विकास कामांची उद्घाटने घ्यायची व मुळच्या सुविधा ना-दुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीकडे मुद्दाम पाठ फिरवण्याचे कट कारस्थान सुुरु आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी पहिल्या पाचमध्ये येतात तर सातारा नगरपरिषदेला 15 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. यावरूनच सातारा नगरपरिषदेत काय चालले आहे, हे समजते. अधिकारी-पदाधिकारी कमिशनच्या तालावर आपल्या आपल्या ठिकण्यावर बसले आहेत. त्यांना भविष्यात येणार्‍या वादळाची पुसटशी कल्पना आली आहे. त्यामुळे आपल्याला त्रिशंकू भगाातील मतदार कोणीच किंमत देणार नाही. तसेच आपल्या नेत्यांनाही या भागातील मतदार मते देत नाहीत, त्यामुळे आपणास याकडे लक्ष देण्याची काय गरज आहे. असा मनात विचार करून आपली जागा सोडण्यास तयार नाहीत. आगामी पालिकेच्या निवडणूकीत याचे पडसाद दिसून येणार आहेत.

COMMENTS