Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून हा रस्ता पुर्ववत वाहतुकीस खुला करावा मागणीसाठी म्हसवड पालिका कार्यालयात नागरिकांनी

सावकारांनो याद राखा : धन्यकुमार गोडसे
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
कराडच्या प्रशासकीय इमारतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना प्रवेश बंद

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून हा रस्ता पुर्ववत वाहतुकीस खुला करावा मागणीसाठी म्हसवड पालिका कार्यालयात नागरिकांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करुन घोषणा देत पालिका कार्यालय दणाणून सोडल्याचे घटना घडली.
म्हसवड पालिका हद्दीतील म्हसवड-हिंगणी हा स्वातंत्र्यपुर्व ब्रिटीश काळापासूनचा रस्ता होता. या रस्त्या लगतच्या काही शेतकर्‍यांनी रस्त्याच्या मध्यभागी जेसीबीने चर काढून हा रस्ताच वाहतुकीस बंद केला. नागरिकांची गैर सोय होऊ लागल्यामुळे गेली दोन वर्षापासुन पालिकेत वारंवार निवेदने दिली. याबरोबरच पालिका कार्यालयासमोर उपोषणेही केली. पालिकेने या रस्त्याची मोजणी करुन नकाशा प्रमाणे हा रस्ता पुर्ववत वाहतुकीस खुला करण्याबाबतचे लेखी आश्‍वासन नागरिकांना दिले होते. या आश्‍वासनानुसार आज सकाळी नागरिकांनी महिलांसमवेत पालिका कार्यालयात जाऊन लेखी दिलेल्या आश्‍वासनानुसार हा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी केली.
पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी या कामी पोलिस बंदोबस्तची मागणी केली असून तो उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगताच नागरिक संतप्त झाले. पालिका कार्यालयात आज सकाळपासून ठिय्या आंदोलन करुन घोषणा देत पालिका कार्यालय दणाणून सोडले.
सायंकाळी पाच वाजता पालिका कार्यालयात पोलीस आले व त्यानंतर उद्या सकाळी हा रस्ता पोलिस बंदोबस्तात मोजणी केलेल्या नकाशा प्रमाणे पुर्ववत तयार करुन तो वाहतुकीस कायमस्वरुपी खुला करुन देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन स्थगित केले. दरम्यानच्या कालावधीत आंदोलनकर्त्यांनी पालिकेसमोर निवेदने देऊन जर हा रस्ता पालिकेने खुला करुन दिला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
दिवसभरच्या ठिय्या आंदोलनात आदिनाथ कोले, रुपेश माने, आकाश माने, बाळासाहेब माने, विलासराव माने, वंदना माने, भाग्यश्री माने, उषा माने, शीतल माने, रुपेश माने, सागर माने, उत्तम माने, मालोजी माने, अवरंग माने, विजय कोले, हरी कोले, धनाजी माने इत्यादी सहभागी झाले होते.

COMMENTS