अंबाजोगाई । प्रतिनिधीमराठीतील श्रेष्ठ संतकवी पासोडीकार सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहराबाहेर आद्यकवी मुकूंदराज समाधी रस्त्यालगत असून या
अंबाजोगाई । प्रतिनिधी
मराठीतील श्रेष्ठ संतकवी पासोडीकार सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहराबाहेर आद्यकवी मुकूंदराज समाधी रस्त्यालगत असून या समाधी परिसरात मद्यप्राशन,अस्वच्छता, तोडफोड व नासधूस यांसारखे गैरप्रकार सारखेच घडत असल्याने या पवित्र स्थळाची हानी होत आहे. हे होत असलेले गैरप्रकार रोखून या भागाचे संरक्षण तसेच वीजेची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन दासोपंत संशोधन मंडळ,श्री दत्त संस्थान धाकटे देवघर व शहरातील भक्त भाविकांच्या वतीने गुरुवार 5 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, संतकवी सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसरात परिसरात प्रकाश योजना नाही त्यामुळे गैर प्रकारांना वाव मिळत आहे.
त्या अनुषंगाने पोलिस कंट्रोल रूमशी संलग्न सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात यावेत.संपूर्ण परिसराभोवती संरक्षक भिंत उभारून वाढत्या अतिक्रमणास प्रतिबंध करावा नियमित पोलिस गस्त वाढवावी स्थानिक प्रशासनाने स्वच्छता व देखभाल करावी, सर्वज्ञ दासोपंत समाधी स्थळ हे पवित्र स्थान असल्यामुळे त्याचे जतन व संरक्षण करावे त्याच बरोबर जवळच असलेल्या नृसिंह तीर्थ स्मशानभुमीतही स्वच्छता, संरक्षक भिंत तसेच प्रखर विजेच्या दिव्यांची व्यवस्था करावी. या मागणी निवेदनाच्या प्रती आ.नमिता मुंदडा,अप्पर पोलीस अधीक्षक,बीड,तहसीलदार,अंबाजोगाई, मुख्याधिकारी,नगर परिषद,मा.नगराध्यक्ष, अंबाजोगाई यांना देण्यात आल्या असून निवेदनावर दिगंबर गोस्वामी ऍड.मकरंद पत्की,श्रेयस गोस्वामी,डॉ.प्रज्वल देशपांडे,लक्ष्मीकांत गोस्वामी,अविनाश जोशी,राहूल देशपांडे,डॉ.सुधीर धर्मपात्रे,ए.पी.देशपांडे, पद्माकर कुलकर्णी, मकरंद सोनेसांगवीकर, ऍड.राघवेंद्र,देशपांडे,ऍड.डी.पी.रांदड,प्रतीक पुसरेकर,ऍड.अमर देशपांडे,सुश्रुत पुराणिक,संतोष देशपांडे,कृष्णा सनगावकर,गजानन देशपांडे,शशीकुमार कुर्लेकर,मंगेश गोस्वामी,भास्कर देशपांडे शंतनू परळकर,सुमंत गोस्वामी,अमोघ कुलकर्णी,बालासाहेब मुंडे,श्रीकांत गोस्वामी,महेश आराध्ये,अविनाश अघोर,अभय जोशी, पद्माकर सेलमोकर,सागर दिक्षित,सुमित केजकर,विश्वंभर गोस्वामी आदीसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS