Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गटारीचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद करा : ढाकणे

कोपरगाव शहर : शहरातील सर्व गटारीचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद करावे अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठाण ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरामधून दक्षिणगंगा गोदावरी वाहते. नदीच्या कडेला किमान १४ पौराणिक शिवलिंग आहेत. आजूबाजूच्या चाळीस-पन्नास किलोमीटर पर्यंत गावची यात्रा असेल तर त्या गावच्या ग्रामदैवताला आंघोळीसाठी गोदावरी नदी पात्रातून पाणी कावडीने नेले जाते.  गुरु शुक्राचार्य महाराज वर्षामधून सहा वेळा गोदावरी नदीच्या भेटीला येऊन अंघोळ करतात अशी आख्यायिका आहे. अशा पवित्र नदीत, सध्या तिच्यामध्ये हनुमान नगर ते मोठा पूल, साई सिटी ते मोठा पूल या भागातील सर्व मलमूत्र-केमिकल युक्त गटारी नगरपरिषदेने सोडले आहे. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये अमोनिया मुळे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आहे. ऑक्सीजन भेटत नसल्यामुळे नदीच्या पाण्यामधील जीवसृष्टी नष्ट झाली आहे, लाखो मासे मरून पडतात. याला हे सर्व गटारीचे पाणी जबाबदार आहे. तसेच २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होत असुन नाशिक बरोबरच कोपरगाव येथुन वहाणाऱ्या गोदावरी नदीत बरेच संत महात्म, भाविक स्नानासाठी येतील. त्या सर्वांनी अशा मलमुत्र पाण्यात स्नान करणे योग्य नाही. मी नगर परिषदेला विनंती करतो आपण लवकरात लवकर या सर्व गटारीचे पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडणे बंद करावे अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये दाद मागावी लागेल. २०२२ मध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे पण याबाबद लेखी तक्रार केलेली आहे.

कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला
शिर्डी परिसरातील घरांवरील कारवाया थांबवाव्यात; डॉ.राजेंद्र पिपाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने गौरव

कोपरगाव शहर : शहरातील सर्व गटारीचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद करावे अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठाण ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरामधून दक्षिणगंगा गोदावरी वाहते. नदीच्या कडेला किमान १४ पौराणिक शिवलिंग आहेत. आजूबाजूच्या चाळीस-पन्नास किलोमीटर पर्यंत गावची यात्रा असेल तर त्या गावच्या ग्रामदैवताला आंघोळीसाठी गोदावरी नदी पात्रातून पाणी कावडीने नेले जाते.  गुरु शुक्राचार्य महाराज वर्षामधून सहा वेळा गोदावरी नदीच्या भेटीला येऊन अंघोळ करतात अशी आख्यायिका आहे.

अशा पवित्र नदीत, सध्या तिच्यामध्ये हनुमान नगर ते मोठा पूल, साई सिटी ते मोठा पूल या भागातील सर्व मलमूत्र-केमिकल युक्त गटारी नगरपरिषदेने सोडले आहे. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये अमोनिया मुळे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आहे. ऑक्सीजन भेटत नसल्यामुळे नदीच्या पाण्यामधील जीवसृष्टी नष्ट झाली आहे, लाखो मासे मरून पडतात. याला हे सर्व गटारीचे पाणी जबाबदार आहे. तसेच २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होत असुन नाशिक बरोबरच कोपरगाव येथुन वहाणाऱ्या गोदावरी नदीत बरेच संत महात्म, भाविक स्नानासाठी येतील. त्या सर्वांनी अशा मलमुत्र पाण्यात स्नान करणे योग्य नाही. मी नगर परिषदेला विनंती करतो आपण लवकरात लवकर या सर्व गटारीचे पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडणे बंद करावे अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये दाद मागावी लागेल. २०२२ मध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे पण याबाबद लेखी तक्रार केलेली आहे.

COMMENTS