Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पडेगावात दोन गटामध्ये तुफान दगडफेक

छ. संभाजीनगर ः कटलेला पतंग आणण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या त्याच्या आई व आजीलाही मारहाण करण्यात आली.

औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात
नांदेड जिल्ह्यात 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप

छ. संभाजीनगर ः कटलेला पतंग आणण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या त्याच्या आई व आजीलाही मारहाण करण्यात आली. याचे काही वेळातच तीव्र पडसाद उमटून पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात दंगल उसळली. दोन मुस्लिम गटांत सुमारे दीड तास तुफान दगडफेक झाली. यात पाच जण गंभीर जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना 6 अश्रुधुराच्या नळकांड्या आणि 4 हँडग्रेनेड फोडावे लागले. परस्पर विरोधातील तक्रारींवरून 64 जणांविरोधत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून सुमारे 50 जणांना ताब्यात घेतले.

COMMENTS