Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक

मुंबई : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार पवई येथे घडला. याप्रकरणी पवई पोलिसांनी सरकारी काम

पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.
*मोठी बातमी : दौंड शहरात शिव जनसेवा कोविड केअर सेंटर चा उदघाटन सोहळा संपन्न… | Lok News24*
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला स्थगिती

मुंबई : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार पवई येथे घडला. याप्रकरणी पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार संजय सानप (52) पवई पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या मोबाइल -5 या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पथक पवई परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पवई परिसरात पती पत्नीला मारहाण करीत असल्याचा दूरध्वनी त्यांना नियंत्रण कक्षाकडून आला. त्यानुसार ते पवईतील गौतम नगर येथे पोहोचले. त्यावेळी महिलेने पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस पथकाने महिला व तिच्या पतीला गाडीत बसवले व ते पोलिस ठाण्यात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अचानक समोर आलेल्या व्यक्तीने वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे वाहनाच्या काचेचे नुकसान झाले. पोलिसांनी वाहनाची पाहणी करून दगडफेक करणार्‍या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तो घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव अजय अग्रवाल असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागवली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. सानप यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS