Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत एसी लोकलवर दगडफेक

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. चर्चगेट ते विरार दरम्यान,

मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट; 33 जणांचा मृत्यू | LokNews24
अबब! बेरोजगारच बेरोजगार !
सिव्हीलच्या दारात उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. चर्चगेट ते विरार दरम्यान, धावणार्‍या जलद एसी लोकल वर ही दगडफेक करण्यात आली. कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान ही घटना दुपारी तीन वाजून 38 मिनिटांनी ही घटना घडली असून दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्या तुटल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दगडफेकी त कोणत्याही प्रवाशाला जखम किंवा इजा झालेली नाही. या संदर्भात बोरिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

COMMENTS