Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीची मोपेड विकणारा अटकेत  

अहमदनगर/प्रतिनीधी ः चोरीची मोपेड दुचाकी मोटारसायकल विक्री करणार्‍या एकास कोतवाली पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी एक मोपेड दुचाकी जप्त केली.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते पत्रकारांना स्वलिखीत पुस्तके व छत्रीचे वाटप..
ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट
आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय

अहमदनगर/प्रतिनीधी ः चोरीची मोपेड दुचाकी मोटारसायकल विक्री करणार्‍या एकास कोतवाली पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी एक मोपेड दुचाकी जप्त केली. ही कारवाई बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौकात केली.
या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस, कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक इसम चाणक्य चौकात चोरीची मोपेड, मोटारसायकलची विना कागदपत्रासह विक्री करण्याकरिता येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने कोतवाली पोलिसांनी अधिक विश्‍वासात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांने त्यांचे नावे ऋषभ प्रकाश क्षेत्रे ( वय 22 वर्ष रा जहागिरदार चाळ बुरुडगावरोड, अ.नगर ) असे असल्याचे सांगीतले. मोपेड दुचाकीचे कागदपत्र नाहीत. व एका तोंड ओळखीचा माणसाने ही क्सेस मोपेड गाडी विक्री करण्याकरिता दिली आहे. त्यामुळे मी विक्री करण्याकरिता आलो आहे असे सांगीतले. पोलिसांनी त्याच्याकडील 30 हजार रुपये किमतीची सुझुकी क्सेस मोपेड गाडी (विना क्रमांकाची) मोपेड गाडी ाबत माहिती विचारपुस केली असता त्याने काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्याने कोणतीही कागदपत्र सादर केली नाहीत.  या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल सागर मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ऋषभ क्षेत्रे याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार गणेश धोत्रे, पोलिस कॉन्स्टेबल सागर मिसाळ करीत आहे.

COMMENTS