Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदार हवालदील

मुंबई : चीनमधील कोरोनोसदृश्य एमएमपीव्ही विषाणूचे दोन रूग्ण सोमवारी भारतात आढळल्यानंतर खळबळ उडाली. या विषाणूमुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती असल्

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित
रवळगाव मध्ये रस्त्याची कामे निकृष्ट संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : चीनमधील कोरोनोसदृश्य एमएमपीव्ही विषाणूचे दोन रूग्ण सोमवारी भारतात आढळल्यानंतर खळबळ उडाली. या विषाणूमुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती असल्याचे बोलले जात असतांनाच दुसरीकडे सोमवारी शेअर बाजारातील परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेणे सुरू केल्यामुळे शेअर बाजार देखील कोसळतांना दिसून येत आहे. याच विषाणूचा प्रसार जगभरात होत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होतांना दिसून येत आहे.
सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1200 हून अधिक अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीनेही नेहमीप्रमाणे सेन्सेक्सचाच कित्ता गिरवत 400 अंकांनी खालची पायरी गाठली! सकाळच्या सत्राची सुरुवात होताच शेअर बाजारात काहीशी तेजी पाहायला मिळाली.

COMMENTS