Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स हजार अंकांनी घसरला

मुंबई : देशामध्ये वाढत असलेली व्यापारी तूट, यासोबतच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत झालेली रूपयाची विक्रमी घसरण आणि जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय

ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले
ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन लांबणीवर

मुंबई : देशामध्ये वाढत असलेली व्यापारी तूट, यासोबतच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत झालेली रूपयाची विक्रमी घसरण आणि जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरून दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजार सावरत असतांनाच पुन्हा एकदा मंगळवारी शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्समध्ये तब्बल 100 हजार अंकांनी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनेही निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.
या आठवड्यात सलग दुसर्‍या दिवशी गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. डिसेंबर महिनाही शेअर बाजारात अस्थिरतेने जात आहे. मंगळवारची सुरुवात बाजारातील घसरणीने झाली आणि नंतर ही घसरण वाढतच गेली. दिवसभरातील नीचांकी पातळीवर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी 332 अंकांनी घसरून 24,336 वर बंद झाला. सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरून 80,684 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 746 अंकांनी घसरून 52,834 वर बंद झाला.

COMMENTS