Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर रविवारी डासोत्पत्तीची स्थाने तपासून डेंग्यूमुक्त राहा

लातूर प्रतिनिधी - दर रविवारी आपल्या घराच्या छतावर तसेच अंगणात अडगळीचे बिनकामी निरुपयोगी साहीत्य टायर्स, बाटल्या पडलेले आहे का हे तपासून त्याची व

‘एक देश, एक निवडणूक’ वर शिक्कामोर्तब !
श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू
नवजात अर्भकाला फेकले हॉस्पिटलच्या खिडकीतून

लातूर प्रतिनिधी – दर रविवारी आपल्या घराच्या छतावर तसेच अंगणात अडगळीचे बिनकामी निरुपयोगी साहीत्य टायर्स, बाटल्या पडलेले आहे का हे तपासून त्याची विल्हेवाट लावावी. घंटागाडीकडे द्यावे किंवा झाकून ठेवावे. तसेच त्यात पावसाचे थोडे जरी पाणी साचलेले असेल तर ते जमिनीवर फेकून द्यावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सतत पाऊस चालू असल्याने छतावरील, अंगणातील साहित्यात पावसाचे पाणी साचून एडीस इजिप्ती डासाची पैदास होवून घरातील व्यक्तींना डेंग्युचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच या दिवसात फुलझाडाच्या कुंड्यांमधील पाणी, ट्री प्लॅन्टच्या प्लेटमधील पाणी, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे मधील पाणी न बदलल्यास यामध्ये देखील डेंग्युच्या डासाचे पैदास होवून घरातील व्यक्तींना डेंग्युचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी महानगरपालिकेचे एम. पी.डब्ल्यू, एएनएम व आशा स्वयंसेविका घरोघरी येवून याची तपासणी करण्याचे व माहिती देण्याचे काम सतत करीतच आहेत. तथापि प्रत्येक घरात आत मध्ये जावून सर्व तपासणी करण्यास ब-याच वेळी अडचणी येत असतात. शहरातील सर्व नागरिकांना दर रविवारी आपल्या घरातील फुलझाडाच्या कुंड्या, ट्री प्लॅन्टच्या ट्रे मधील पाणी, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे मधील पाणी बदलावे. या प्रमाणे आठवड्यातून किमान एक वेळेस अर्थात दर रविवारी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील साहित्याची अंतर्गत तपासणी करावी व डेंग्युच्या विरोधातील महानगरपालिकेच्या मोहिमेस वरील प्रमाणे कार्यवाहीच्या माध्यमातून नागरीकांनी सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS