Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिवरायांचा पुतळा आणि काही प्रश्‍न !

भारतासारख्या देशाला भ्रष्टाचाराचा रोग जडला आहे. हा रोग इतका तीव्र आहे की, त्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र या भ्रष्टाचारात सर्व

तिसर्‍या आघाडीच्या दिशेने !
पक्षफुटी आणि परतीचे दोर
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सुरक्षा ऐरणीवर  

भारतासारख्या देशाला भ्रष्टाचाराचा रोग जडला आहे. हा रोग इतका तीव्र आहे की, त्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र या भ्रष्टाचारात सर्वच आकंठ बुडाले आहेत. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांची मिलीभगत असल्यामुळे टक्केवारीच्या गणितात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो. रस्ते, बांधकाम, पूल, यासह सर्वच क्षेत्र भ्रष्टाचारात आंकठ बुडाले असतांना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील सोडले नाही. गुणवत्तेचे कोणतेही मानके न पाळल्यामुळेच हा पुतळा कोसळला आणि राज्यभर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उमटली. भारतीय नौदलाच्या कार्यक्रमात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या पुतळ्याचे उद्धाटन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता. अवघे 8 महिने उलटत नाही, तोच हा पुतळा कोसळतो, त्यामुळे या पुतळ्याचे आयुर्मान अवघे 8 महिने होते, त्यावरून या कामाची गुणवत्ता कशी होती, ते स्पष्ट होते. या कार्यक्रमाच्या आधीच संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते की, तुम्ही एवढी घाई गडबड करू नका. मात्र आपले हितसंबंध जपण्यासाठीच त्या कामांच्या निविदा आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुतळ्याचे काम नित्कृष्ठ झाल्याचे दिसून येत आहे. याउलट सत्ताधार्‍यांकडून मात्र जोरदार हवा असल्यामुळे पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. वास्तविक पाहता हा पुतळा अतिशय घाईगडबडीत उभारला गेला होता. यासंदर्भात खुद्द छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते की, पुतळाचे काम निकृष्ठ आहे, त्यात कोणतीही गुणवत्ता नाही. असे असतांना प्रशासन आणि शासनाने त्यांच्या पत्राची दखल घेवून जर यासंदर्भात चौकशी समिती नेमली असती आणि खरंच पुतळ्याची गुणवत्ता योग्य आहे की नाही, याची खातरजमा केली असती तर, आजचा दिवस उगवला नसता. मात्र आपल्याकडे घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यात येतो. मग त्यात कधी पुतळा कोसळतो, कुणाचा जीव जातो, चिमुरड्यावर अत्याचार होतो. त्यामुळे घटना घडल्यानंतर आपण जागे होतो ही वास्तविकता आहे. त्यामुळे यामध्ये बदल करण्याची खरी गरज आहे. शिवरायांकडून राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्याची गरज आहे. शेकडो वर्षांपूर्वी शिवरायांनी उभारलेले गड, किल्ले, किल्ल्यांवरील मंदिरे अजूनही जशास तसे आहेत, असे असतांना राज्यकर्त्यांनी सर्व बाबींचा विचार करून पुतळा का उभारला नसेल याची चौकशी होण्याची गरज आहे. खरंतर पुतळ्याचे काम सुरू असतांना छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही. देशभरात अनेक दशकांपूर्वी अनेक पुतळे उभारण्यात आले आहे. मात्र पुतळा कोसळण्याची घटना आजमितीस घडली नाही. 1956 साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. खरंतर प्रतापगड हा किल्ल्लाच डोंगरदर्‍यात आहे. त्यामुळे याठिकाणी वार्‍याचा, पावसाचा वेग सर्वाधिक असतांना हा पुतळा आजही सुस्थितीत आहे. अनेक पुतळ्यांसाठी कलाकारांनी वापरलेल्या अजोड नाविण्यपूर्ण बाबींचे आजही कौतुक होते. मात्र तरीही शेकडो वर्षांपासून हे पुतळे आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वांची चौकशी होवून याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची खरी गरज आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली आहे. त्याचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. मात्र आजमितीस काम पुढे गेलेले नाही. त्यामुळे सरकारची या

COMMENTS