Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक 2025 पुरस्कर प्रसाद भडके यांना जाहीर

अहिल्यानगर- युवकांना प्रेरणा देऊन उद्योजकतेकडे वळवणारे युवा उद्योजक प्रसाद भडके यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक पुरस्कार

भिंगार पोलिसांकडून दहा गोवंशीय जनावरांची सुटका
कर्मवीर काळे कारखान्याचे आज बॉयलर अग्निप्रदीपन
राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे

अहिल्यानगर- युवकांना प्रेरणा देऊन उद्योजकतेकडे वळवणारे युवा उद्योजक प्रसाद भडके यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली. प्रसाद भडके हे गेल्या पंधरा वर्षापासून अर्थवेध इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून युवकांना जीवनात यशस्वी होण्यासाठीचे विविध प्रशिक्षण,  नियोजन व मार्गदर्शन करत आहेत. आत्तापर्यंत दोन हजार कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असून भविष्यकाळातही अशाच पद्धतीने कामकाज करण्याचां मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त ते दरवर्षी विविध समाजसेवी संस्थांना मदत करत असून हा पुरस्कारही त्यांनी मातोश्रीला अर्पण केला आहे. सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे.  प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक क्षेत्रातील समुपदेशन, सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील असतात. प्रसाद भडके यांना राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल माजी महापौर बाबासाहेब  वाकळे, नंदनवन उद्योग समूहाचे चेअरमन संजय जाधव, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे व शब्दगंध चे सचिव सुनील गोसावी, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS