जामखेड प्रतिनिधी ः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने 28 फेबु्रवारी रो
जामखेड प्रतिनिधी ः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने 28 फेबु्रवारी रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अंदोलन जामखेड तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. याबाबत 27 फेब्रुवारी रोजी जामखेड येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन या अंदोलनाची सुरूवात करण्यात आली होती.
यानंतर जामखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर एकत्र येत सर्व संघटनांच्या पदाधिकारी व सभासद आंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने लाक्षणिक अंदोलन करण्यात आले होते.यावेळी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे अंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सरकार विरोधी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. अंगणवाडी कर्मचार्यांना मानधन नको वेतन हवे, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, व ग्रॅच्युईटी मिळावी, अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणार्या पुरक पोषण आहाराच्या रक्कमेत वाढत्या महागाईनुसार वाढ करणे. अंगणवाडी सेविकांना कार्यक्षम मोबाईल देण्यात यावेत व त्यांच्या वैयक्तीक मोबाईलवर माहिती भरण्याची सक्ती करु नये व पोषण ट्रॅकर अँप संपूर्णपणे मराठी भाषेत देण्यात यावे. सेवानिवृत्त व मृत पावलेल्या कर्मचा-यांचे थकित सेवासमाप्ती लाभ विनाविलंब द्यावेत, नव्याने विकसीत होणा-या शहरांमध्ये लोकसंख्या झपाटयाने वाढत असल्यामुळे 800 ते 1000 लोकसंख्येला 1 अंगणवाडी केंद्र हे प्रमाण कायम ठेवावे व ज्या अंगणवाडी क्षेत्रातील लोकसंख्येत वाढ झाली आहे तेथे नवीन अंगणवाडी केंद्र उघडण्यात यावे, अश्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनशक्ती, यांनी संप पुकारला होता. तसेच मागण्यांसाठी मूंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.
COMMENTS